Skip to main content

Posts

Featured

आठवणी -१

  मुलायम पीतरेशमी फुलांची कुरणे , पसरलेले हिरवे गालिचे आणि आर्देन्सच्या रानातले सोनेरी कवडसे परिसराला कवेत घेणारी म्यूस, तिच्या निळ्या पाण्याचे, बाजूच्या कडे-टेकड्यांना पडलेले लयदार वळसे दिनांतच्या रंगीत किनाऱ्यावर, तर कधी बलदंड किल्यांच्या माथ्यावरून , डोळेभरून बघितले, म्यूसचे असे वाहते राहणे || कधी अचानक दिसते, डोळ्यासमोर फुललेली वासंतिक पायवाट, ऱ्हाईनच्या कडेने पाण्याला सोबत करताना तर कधी आठवतात उंच गिरिजाघरे, क्षितिजावर, जलपटाच्या पलीकडे ढगाळ आकाशात झेपावताना || पॉन्ट दु गार्डचा भव्य नजारा, दोन्ही तीरांना सांधून उभा, त्यावर चालणारी पावले अविरत संथ जणू काही स्तब्ध , गार्दोचे हिरवे काळे पाणी पाषाणबद्ध, पाण्याची पुलाला, शतकांची मूक सोबत || आणि दिसतात मग त्या झगमगत्या, श्रीमंती प्रासादांनी वेढलेल्या, थेम्स आणि सीन.... गढूळ, थांग न लागणाऱ्या पाण्याने, तीरावरचे असंख्य चेहरे झेलणाऱ्या, क्षणोक्षणी कणाकणाने थकणाऱ्या पावसाळी काळोखात करड्या सिमेंटी रंगाच्या आणि प्रसन्न वसंतात,उजळणाऱ्या प्रकाशाने हसणाऱ्या, शहरी नद्या || पुन्हा वाटते जावे त्या सोर्गच्या शीतल प्रवाहापाशी ,उंच डोंगराच्या सावलीत

Latest Posts

गिरी शिखरी, कुंजवनी

कोणे एके काळी, एकशिला नगरी..